- Advertisement -
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वरळी येथे जाहीर सभा होती. कोळी बांधवांकडून मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जाहीर नागरी सत्कार करण्यात येणार होता. तसेच सभेचा गाजावाजासुद्धा करण्यात आला होता. शहरात बॅनरबाजी करण्यात आली होती. मात्र मुख्यमंत्री सभास्थळी पोहोचल्यानंतर अनेक लोकांनी सभेतून काढता पाय घेतला. यामुळे सभेतील खुर्च्या खाली असल्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर विरोधकांनी व्हायरल केले आहेत.
- Advertisement -