मुंबईकर तरुणी प्रियंका चमणकर हिने बनवले बाप्पासाठी खास ‘३डी’ जेली मोदक

बाप्पाचा आवडता पदार्थ म्हणजे मोदक. आतापर्यंत मुंबईतील बाजारात खव्याचे, उकडीचे, चॉकलेट आणि काजूचे मोदक विक्रीसाठी मिळतात, हे आपल्याला माहित होते. पण, आता बाप्पासाठी मिळणारे स्पेशल ‘३डी’ जेली मोदक चांगलेच चर्चेत आहे. मुंबईच्या पवई भागात कॅफे चालवणाऱ्या प्रिया चमणकर या तरुणीने युनिक थ्रीडी जेली मोदक तयार केले आहेत. हे मोदक कसे बनवायचे याचे प्रशिक्षणही ती देतेय.