घरव्हिडिओमहिलांवरील वाढते अत्याचार रोखण्यासाठी सरसावली 'अबोली'

महिलांवरील वाढते अत्याचार रोखण्यासाठी सरसावली ‘अबोली’

Related Story

- Advertisement -

हल्ली प्रत्येक क्षेत्रात स्त्रिया पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून यशाचे शिखर गाठत आहेत. त्याचप्रमाणे स्त्री चालकांच्या आयुष्यात ‘अबोली’ रिक्षा आली आणि त्यांना रोजगाराचे एक वेगळे साधन मिळाले, ज्यामुळे अनेकींना आर्थिक स्वातंत्र्य मिळाले. अशा आत्मसन्मान मिळवलेल्या २०० स्त्रिया आज ठाण्यामध्ये, तर ५० जणी पनवेलमध्ये ही अबोली रिक्षा चालवत आहेत. याशिवाय प्रवास करताना महिलांना सुरक्षित वाटेल या उद्देशाने महिलांनी महिलांसाठीच सुरु केलेली ही ‘अबोली रिक्षा’ आज अनेक विरोध पत्कारत रस्त्यांवर धावत आहे. ही ‘अबोली रिक्षा’ मोटार वाहन विभागातल्या पहिल्या महिला साहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी ठरलेल्या आणि सध्या वाशी येथे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी असलेल्या आजच्या रणरागिणी, हेमांगिनी पाटील यांच्या संकल्पनेतून सुरु झाली आहे.

- Advertisement -