घरव्हिडिओक्रिकेट खेळणाऱ्या १० तरुणांवर दंडात्मक कारवाई

क्रिकेट खेळणाऱ्या १० तरुणांवर दंडात्मक कारवाई

Related Story

- Advertisement -

सांगलीत लॉकडाऊनचे नियम मोडून क्रिकेट खेळणाऱ्या दहा तरुणांवर सांगली पोलिसानी दंडात्मक कारवाई केली आहे. सांगलीच्या आंबेडकर स्टेडियम  येथे १४ तरुण क्रिकेट खेळत होते. यातील चार जण पोलिसांना पाहून पळून गेले. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जिल्ह्यात कडक लॉकडाऊन लावण्यात आला आहे. पण, याचे उल्लंघन केले जात असल्याचे दिसून येत आहे. सांगलीच्या आंबेडकर स्टेडियमवर तरुण क्रिकेट आणि काही जण व्यायाम करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. सदर ठिकाणी पोलिसांनी जाऊन तरुणांना ताब्यात घेतले. मात्र, त्यातील चार जण पळून गेले तर १० जणांवर पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली.

- Advertisement -