सणाच्या आनंदासोबत जबाबदारीचेही भान हव

आपल्या सणवाराच्या माध्यमातून सगळी संस्कृती आपल्या पुढच्या पिढीसाठी शिकवण्याचा एक प्रयत्न आमच्याकडून करण्यात येत आहे. माझ्या कुटुंबातील इतर मंडळी नास्तिक आहेत, पण माझ्या पत्नीच्या निमित्ताने आणि मुलीच्या निमित्ताने मीदेखील ही संस्कृती जोपासण्याचा प्रयत्न दीपावलीच्या सणाच्या निमित्ताने करत आहे. यंदाची दिवाळी ही कोरोनाच्या संकटानंतरची आलेली दिवाळी आहे. पण दीपावलीचा यंदाचा सण सगळ्यांकडूनच तितक्याच जबाबदारीची अपेक्षाही करतोय. फटाक्यांच्या मर्यादेसोबत सणासाठी गर्दी न करता सर्वांचीच जबाबदारी महत्वाची ठरणार आहे.