Saturday, February 27, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ 'कंगनाने फिरवली पाठ उर्मिलाने दिली साथ'

‘कंगनाने फिरवली पाठ उर्मिलाने दिली साथ’

Related Story

- Advertisement -

गेल्या अनेक काळापासून अभिनेत्री कंगना राणौत वादग्रस्त वक्तव्यांमुळे टीकेची धनी होत आहे. यात आता बॉलिवूड अभिनेत्री मालवी मल्होत्रानेही कंगनावर आरोप केले आहेत. मालवी मल्हात्राने ‘गीशा’ या वेबसिरिजच्या लाँचिंगदरम्यान माय महानगरसमोर कंगनासंदर्भात एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. काही महिन्यांपूर्वी अभिनेत्री मालवीवर चाकू हल्ला झाला होता. मालवी अनेक महिने मृत्यूशी झुंज देत होती. यावेळी कंगनाने मला पूर्ण मदत करण्याचे आश्वासन दिले तसे सोशल मिडियावरही आवाहन केले. परंतु ज्यावेळी मदतीची खरी गरज होती त्यावेळी कंगनाने काढता पाय घेतला. कंगना माझ्या गावतील एक मुलगी आहे. त्यामुळे एक गावातील व्यक्ती म्हणून तरी कंगनाने मला साथ देणे गरजेचे होते परंतु तसे झाले नाही. त्यावेळी मला शिवसेना नेत्या उर्मिला मातोंडकर आणि मुंबई पोलिसांनी खरी साथ दिली त्यामुळे कंगना माणूसकीची विसर पडला आहे. असा आरोप मालवीने केला.

- Advertisement -