Monday, December 5, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ आदित्य ठाकरेंची अब्दुल सत्तारांवर टीका

आदित्य ठाकरेंची अब्दुल सत्तारांवर टीका

Related Story

- Advertisement -

महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री यांनी काल खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या बद्दल अपशब्द वापरल्याने संपूर्ण राज्यभर त्यांच्यावर टीका होत आहे, राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस व इतर विरोधी पक्ष या वक्तव्याचा तीव्र निषेध करत असून ठीक ठिकाणी सत्तार यांच्या पुतळ्याचे दहन करून निषेध व्यक्त केला जात आहे. यामुळे राज्यात प्रचंड तणावाचे वातावरण तयार झाले असून या सर्व बाबी लक्षात घेता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांचा राजीनामा घ्यावा असे मत आज युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे हे आज जालना येथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली आहे ते आज जालना जिल्हा दौऱ्यावर होते. तसेच त्यांनी यावेळी मुख्यमंत्रीपद हे घटनाबाह्य आहे असं मतही व्यक्त केलं आहे.

- Advertisement -