Monday, March 20, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ अद्वय हिरेंच्या ठाकरे गटातील प्रवेशाने राजकीय सामना रंगणार

अद्वय हिरेंच्या ठाकरे गटातील प्रवेशाने राजकीय सामना रंगणार

Related Story

- Advertisement -

नाशिकच्या मालेगावमधील भाजपा नेते अद्वय हिरेंनी ठाकरे गटात प्रवेश केला आहे. या प्रवेशामुळे भाजपा तसेच शिंदे गटालासुद्धा मोठा धक्का बसला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरेंकडून अद्वय हिरेंच्या हाती शिवबंधन बांधण्यात आले. यावेळी ठाकरे गटाचे प्रमुख नेते उपस्थित होते. अद्वय हिरेंच्या ठाकरे गटातील प्रवेशामुळे उत्तर महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे. कारण उत्तर महाराष्ट्रात अद्वय हिरे पाटील यांच्या घराण्याचा चांगलाच दबदबा आहे. उद्धव ठाकरे लवकरच मालेगावत सभा घेणार असल्यामुळे भाजप आणि शिंदे गट निशाण्यावर असेल. या सभेदरम्यान ठाकरे विरुद्ध शिंदे फडणवीस सरकार असा एकंदरीत सामना पाहायला मिळेल.

- Advertisement -