- Advertisement -
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या बंडखोरीनंतर आता अजित पवार विरुद्ध शरद पवार असे दोन गट झाले आहेत. त्यामुळे दोन्ही गटांकडून राष्ट्रवादी पक्षावर आणि घड्याळ चिन्हावर दावा केला जात आहे. हे प्रकरणी आता निवडणूक आयोगाकडे पोहोचले आहे. त्यामुळे राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळ चिन्ह कोणाला मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेय. असे असतानाच अजित पवार गटाला पक्षासह चिन्हही मिळणार असल्याचा दावा अजित पवार गटाचे राष्ट्रीय नेते प्रफुल्ल पटेल यांनी केला आहे.
- Advertisement -