घरव्हिडिओ'केंद्राने इंजेक्शनचा साठा वाढवावा'

‘केंद्राने इंजेक्शनचा साठा वाढवावा’

Related Story

- Advertisement -

“कोरोनातून बरे झाल्यानंतर बऱ्याच जणांना आता म्युकरमायकोसिस या आजाराची लागण होत आहे. याचे प्रमाण देखील वाढलेले आहे. परंतु, चिंताजनक बाब म्हणजे म्युकरमायकोसिसच्या इंजेक्शनचा तुटवडा जाणवू लागला आहे. कारण हा आजार झालेल्या व्यक्तीला दिवसाला सहा इंजेक्शन द्यावी लागत आहेत. तर या आजाराचे प्रमाणे इतके आहे की, महिन्याभरात लाखोंची इंजेक्शन द्यावी लागत आहेत. म्हणून राज्य सरकारने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे की या आजाराचा समावेश महात्मा फुले जनआरोग्य योजनेत त्याचा अंतर्भाव करायचा. त्याप्रमाणे त्याचे आदेश देखील काढण्यात आले आहेत. तसेच या आजाराच्या इंजेक्शनचा साठा वाढवण्याची मागणी करण्यातही आली आहे. याबाबत कंपन्यांशी देखील संवाद आहे. परंतु, त्यांनी सांगितले की केंद्र सरकार सांगणार कोणत्या राज्याला किती इंजेक्शन देण्यात यावीत”, त्यामुळे केंद्राने इंजेक्शनचा साठा वाढवावा, अशी मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे.

- Advertisement -