- Advertisement -
आज शरद पवार गट व अजित पवार गट एकमेकांच्या विरोधात उभे ठाकलेले दिसून आले. सकाळी जितेंद्र आव्हाड समर्थकांनी भुजबळांचा पुतळा जाळत आंदोलन केले तर त्याला उत्तर देताना अजित पवार गटाने शहर अध्यक्ष आनंद परांजपे यांच्या नेतृत्वाखाली महापालिका मुख्यालयासमोर आव्हाडांच्या विरोधात जोरदार घोषणा देत जितेंद्र आव्हाड यांचा पुतळा जाळला. त्यावेळी जितेंद्र आव्हाडांनी यामध्ये पडू नये बोलायचे असेल तर पवार साहेब बोलतील तुम्ही बोलणारे कोण? असा सवाल करत आनंद परांजपेंनी जोरदार हल्लाबोल केला.
- Advertisement -