घरव्हिडिओद काश्मीर फाईल्स टॅक्स फ्री करण्यावरून अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा

द काश्मीर फाईल्स टॅक्स फ्री करण्यावरून अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा

Related Story

- Advertisement -

‘द काश्मीर फाईल’ सिनेमाला करमुक्त करा, अशी मागणी विरोधी पक्षाच्या सदस्यांनी केली होती, यावर बोलताना अजित पवार यांनी मिशन मंगल, तानाजी, पानिपत हे सिनेमे करमुक्त केल्याची आठवण करून देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘काश्मीर फाईल’ सिनेमाचा उल्लेख केला त्यामुळे केंद्राने हा सिनेमा करमुक्त करण्याचा निर्णय घेतला तर संपूर्ण देशालाच लागू होईल अगदी जम्मू – काश्मीर ते कन्याकुमारीपर्यत करमुक्त होईल. असे अजित पवार म्हणाले. उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत असताना विरोधी पक्षाच्या सदस्यांनी आक्षेप घेतला मात्र अजित पवार यांचे बोलणे झाल्याशिवाय बोलायला दिले जाणार नाही अशी भूमिका तालिका अध्यक्षांनी घेतल्याने विरोधी पक्षाच्या सदस्यांनी सभात्याग केला. त्यावेळी सत्ताधारी सदस्यांनी ‘पळाले रे पळाले’ म्हणत ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ … ‘जय भवानी जय शिवाजी’ अशा जोरदार घोषणा दिल्या आहेत.

- Advertisement -