- Advertisement -
मराठवाड्यातील सहा आमदारांना आज मंत्रिमंडळ विस्तारात संधी देण्यात आली आहे. यापैकी लातूर जिल्ह्यातील अमित देशमुख यांना देखील मंत्रिमंडळात काम करण्याची संधी मिळाली आहे. शपथविधी झाल्यानंतर अमित देशमुख यांच्या पत्नींनी आपलं महानगरशी बोलताना आपला आनंद व्यक्त केला. तर बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख यांनीसुद्धा आपल्या भावाला मंत्रिपद मिळाल्याबाबत समाधान व्यक्त केले.
- Advertisement -