Friday, August 19, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ फडणवीस सरकारमध्ये वेगाने काम होतायत - अनिल बोंडे

फडणवीस सरकारमध्ये वेगाने काम होतायत – अनिल बोंडे

Related Story

- Advertisement -

राज्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे. पावसाळ्यात तातडीने मदत देण्याबाबत तातडीने पाऊले उचलली जात आहेत. गेल्या अडीच वर्षांमध्ये सुस्तावलेली यंत्रणा आता कामाला लागली आहे. वेगाने काम होत आहेत असे भाजप खासदार अनिल बोंडे म्हणाले. राज्याच्या राजकारणातून देशाच्या राजकारणात येऊन नवीन बदल आनंद देणारा आहे. महाराष्ट्राचे विशेषतः विदर्भ, शेतकरी, शेत मजूर, आणि युवकांचे प्रतिनिधित्व करायला नवीन आव्हान माझ्या समोर आले आहे. राज्याचे मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये चांगला संवाद आहे. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होईल असेही अनिल बोंडे म्हणाले. महाराष्ट्राला समृध्द बनविण्याकरिता जे सरकार प्रयत्न करत असून यामध्ये माझा खारीचा वाटा राहील असे खासदार अनिल बोंडे म्हणाले

- Advertisement -