छत्रपती शिवाजी महाराजांना भारतीय नौदलाचं जनक मानलं जातं. महाराजांनी केलेल्या गौरवशाली कार्याची भूरळ आजही तरुणांच्या मनात कायम आहे. शिवरायांचीच प्रेरणा घेत भांडूपच्या तरुणाने आरमाराची हुबेहूब प्रतिकृती तयार केली आहे.