आगामी लोकसभेसाठी प्रत्येक राजकीय पक्षातर्फे तयारी केली जातेय. भाजपाने ‘मिशन 45’ फिक्स केलंय. यासाठी रणनीती देखील आखली जातेय. अशातच दक्षिण मुंबईकडे भाजपाने मोर्चा वळवलाय. यासाठी विधानससभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्याकडे दक्षिण मुंबईची धुरा सोपवण्यात आलीय.