Thursday, July 7, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ बिल्डरांचे उखळ पांढरे करण्याचे ठाकरे सरकारचे उद्योग

बिल्डरांचे उखळ पांढरे करण्याचे ठाकरे सरकारचे उद्योग

Related Story

- Advertisement -

“आरेमध्ये झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प घोषित केल्यामुळे युवराज आदित्य ठाकरे यांचे पर्यावरण प्रेम पूर्णतः बोगस आणि बेगडी असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे”, असा आरोप आमदार अतुल भातखळकर यांनी केला आहे. “पर्यावरण प्रेम दाखवत मुंबईकरांच्या हक्काच्या मेट्रोचे कारशेड आरे मधून इतरत्र हलविणाऱ्या ठाकरे सरकारने आता आरे मध्येच झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प जाहीर करून आरेची जागा बिल्डरांच्या घशात घालण्याचे कारस्थान चालविले आहे. हे अत्यंत संतापजनक असून युवराज आदित्य ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारचे पर्यावरण प्रेम हे पूर्णतः बोगस आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झाले”, अशी टीका भाजपा मुंबई प्रभारी आणि कांदिवली पूर्वचे आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे. तसेच याविरोधात भारतीय जनता पार्टी मोठे जन आंदोलन उभारेल आणि गरज पडल्यास उच्च न्यायालयात सुद्धा जाणार असल्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला आहे.

- Advertisement -