- Advertisement -
मुंबई महानगरपालिकेने पत्रक काढून बांद्रा येथील कब्रस्तानमध्ये कोरोना बाधित रुग्णांचा मृतदेह दफन करण्यास परवानगी दिली आहे. मात्र येथील स्थानिक नागरिकांनी याला विरोध दर्शविला आहे. या विभागात मोठ्या प्रमाणावर ज्येष्ठ नागरिक राहत आहेत, त्यामुळे कोरोना बाधित मृतदेह येथे दहन करु नयेत, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे. स्थानिक नगरसेविका स्वप्ना म्हात्रे आणि आमदार आशिष शेलार यांनी देखील या मागणीला पाठिंबा दिला आहे.
- Advertisement -