Wednesday, April 14, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ विधानभवनात दारुच्या बाटल्यांचा खच!

विधानभवनात दारुच्या बाटल्यांचा खच!

Related Story

- Advertisement -

राज्याचे पावसाळी अधिवेशन नागपूर येथे सुरु आहे. आज अधिवेशनाचा तिसरा दिवस पावसाचे पाणी साचल्यामुळे वाया गेला. पाणी साचल्यामुळे वीज घालवावी लागली. विधानभवनातील ड्रेनेजमधून पाण्याचा निचरा होऊ शकला नव्हता. याचे कारण आता समोर येत आहे. विधानभवन परिसरात तुंबलेले पाणी बाहेर काढताना गटारांमध्ये मोठ्या प्रमाणात दारूच्या रिकाम्या बाटल्या आढळून आल्या आहेत.
विधानभवनातील गटारात दारूच्या बाटल्या सापडल्याच्या घटनेवर विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी खोचक टीका केली असून, हे सरकार मागील ४ वर्षांपासून शुद्धीवर का नाही, याचे कारण आता उमगल्याचे म्हटले आहे.

- Advertisement -