घरलोकसभा २०१९शिस्तबद्ध भाजप! खासदारानंच आमदाराला जोड्यानं हाणलं, लागोपाठ ७ वेळा थोबाडावर प्रसाद!

शिस्तबद्ध भाजप! खासदारानंच आमदाराला जोड्यानं हाणलं, लागोपाठ ७ वेळा थोबाडावर प्रसाद!

Subscribe

भाजपच्या खासदाराने भाजपच्याच आमदाराला जोड्याने हाणलं, लागोपाठ ७ वेळा दिला थोबाडावर प्रसाद! विडिओ तुफान व्हायरल

मेरा बूथ, सबसे मजबूत असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशभरातल्या कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र मोदींच्या या आवाहनामुळे भाजपचे कार्यकर्ते आणि नेतेमंडळी इतके उत्साहात आले आहेत की त्यांनी चक्क एकमेकांना बडवण्याचाच एककलमी कार्यक्रम हाती घेतलाय की काय अशीच शंका यावी. तसा एक व्हिडिओच सध्या भलताच व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ आहे उत्तर प्रदेशमधल्या संत कबीर नगरमधला. आता या ठिकाणाचं नाव वाचल्यानंतर इथे असं काही घडेल, याची कल्पना देखील करवत नाही. पण तसं घडलंय मात्र खरं!

नक्की काय घडलं?

तर झालं असं, की संत कबीरनगरमध्ये उत्तर प्रदेशच्या स्थानिक पदाधिकारी-नेत्यांची बैठक सुरू होती. या बैठकीला पक्षाचे राज्यातले वरीष्ठ पदाधिकारी आणि सामान्य कार्यकर्ते देखील उपस्थित होते. तेव्हा तिथल्याच एका रस्त्याच्या बांधकाम उद्घाटनाच्या कोनशिलेचा मुद्दा निघाला. तेव्हा इथले स्थानिक खासदार महोदय शरद त्रिपाठी आणि आमदार महोदय राकेश बघेल यांच्यात बाचाबाची सुरू झाली. ‘माझं नाव या कोनशिलेवर का नव्हतं?’ अशी भयंकर तक्रार खासदार महोदयांची होती. तर ‘कुणाचं नाव हवं, कुणाचं नको हा माझा निर्णय आहे’, असा खुलासा आमदार महोदयांचा होता. रागात खासदार महोदयांचा राग इतका अनावर झाला की त्यांनी थेट पायताण काढून आमदार राकेश बघेल यांच्या श्रीमुखात ठेऊन द्यायला सुरुवात केली. एक नाही, दोन नाही तर तब्बल ७ वेळा लागोपाठ आपल्या पायताणाचा प्रसाद खासदार त्रिपाठी यांनी आमदारांच्या श्रीमुखात ठेऊन दिला.

- Advertisement -

भाजपच्या कार्यकर्त्यांचं वेगळंच ‘प्रसंगावधान’!

प्रकरण इतकं विकोपाला गेलं की आसपासच्या पोलिसांना मध्यस्थी करून या दोघांना सोडवावं लागलं! पण या सगळ्या प्रकारात सर्वात हास्यास्पद बाब ही की या दोघांचा राडा सुरू असताना भाजपचेच काही कार्यकर्ते हा सगळा प्रकार आपल्या मोबाईल कॅमेऱ्यांमध्ये व्यवस्थित टिपून घेत होते. त्यांच्यापैकीच काहींनी हा व्हिडिओ व्हायरल केला यात शंका नाही. या प्रकारानंतर भाजपने पक्षांतर्गत कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -