घरव्हिडिओठाण्यात कर्णकर्कश आवाज करणाऱ्या सायलेंसरवर फिरवला बुलडोझर

ठाण्यात कर्णकर्कश आवाज करणाऱ्या सायलेंसरवर फिरवला बुलडोझर

Related Story

- Advertisement -

ठाणे वाहतूक पोलिसांनी एक धडक मोहीम हाती घेतली आहे. दिनांक १५ जून २०२१ पासून सुरु झालेल्या या मोहिमेअंतर्गत आत्तापर्यंत जवळपास एक हजार पेक्षा जास्त सायलेंसर आणि जवळपास ४०० प्रेशर हॉर्न्स बुलडोजर खाली चिरडण्यात आले आहेत.  कानाचे पडदे फाटतील एवढे कर्णकर्कश प्रेशर हॉर्न्स आणि छातीत धडकी भरवणारे सायलेंसर विशेषतः एनफिल्ड बुलेट या गाडीत लावले जातात. त्याचा अनेकांना त्रास होतो. सायलेंसर आणि हॉर्न्स विकणाऱ्या दुकानदारांवर गुन्हे दाखल करून कडक कारवाई केली जाईल असा इशारा  पोलीस आयुक्तांनी दिला.

- Advertisement -