Thursday, April 25, 2024
घरमानिनीमला सैनिकी गणवेशाचं वेड लागलं होतं - कॅप्टन तनुजा काबरे

मला सैनिकी गणवेशाचं वेड लागलं होतं – कॅप्टन तनुजा काबरे

Subscribe

कॅप्टन तनुजांनी त्यांच्या जीवनातील पाच वर्षे भारतीय सैनिक दलाला दिली. त्या काळात सर्विस कमिशन लागू न झाल्यामुळे, त्यांनी निवृत्ती घेतली. निवृत्तीनंतर विविध शाळा कॉलेजमध्ये जाऊन ‘ सैन्यात का गेले पाहिजे, त्यासाठी काय करावं.. यात काय करियर आहे ‘ अशा विषयांवर चर्चा- संवाद घेतले. पालकांसोबत संवाद साधला. एवढेच नव्हे तर सैनिकी प्रशिक्षणाचा छोटासा अनुभव मिळावा म्हणून कुमारवयीन मुले आणि तरुणांसाठी ‘फौजी की पाठशाला’ या शिबिरांची निर्मिती केली आहे. शालेय सुट्ट्यांमध्ये हि ‘फौजी की पाठशाला’ महाराष्ट्रात कोलाड आणि मोहरान फार्म्स, शहापूर या दोन ठिकाणी आयोजित केली जाते. तीन ते सहा दिवसांच्या या शिबिरांमध्ये शारीरिक व्यायामाबरोबरच बौद्धिकंसुद्धा घेतली जातात. आठ ते पंधरा वर्षांची मुलं यात सहभागी होतात.

- Advertisment -

Manini