घरव्हिडिओतिसरी लाट थोपवण्यासाठी घेतली जाते लहान मुलांची काळजी

तिसरी लाट थोपवण्यासाठी घेतली जाते लहान मुलांची काळजी

Related Story

- Advertisement -

नाशिक दिंडोरी तालुका हा आदिवासी बहुल भागातील तालुका आहे. या भागातील जनतेने कोरोना विषाणूला हरवण्यासाठी डॉक्टरांना आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना सहकार्य केले आहे. यामुळे दिंडोरी तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र पांडाणे अंतर्गत असलेल्या अंदाजे ४० ते ५० वाड्या-वस्त्या धरून गावांमध्ये अंगणवाडी सेविका, आशा सेविका, प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सेविका, प्राथमिक आरोग्य सेवक आणि सेविका यांनी अहोरात्र काम करून कोरोनाची दुसरे लाट हाताळण्यास मोलाचे सहकार्य केले आहे. त्याच पद्धतीने तिसऱ्या लाटेची शक्यता असल्याचे सांगितले जात असल्यामुळे नागरिकांनी वारंवार हात धुणे, सोशल डिस्टन्सिंग ठेवणे आणि तोंडाला मास्क लावणे. तसेच लहान बालकाला कोरोनाचे लक्षण दिसल्यास तरीही त्या बालकास दूध पाजण्याचा सल्लाही प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर शशिकांत वाघ यांनी दिला आहे.

- Advertisement -