छोटा भीम आला बाप्पाच्या भेटीला

मुंबईतील अनेक मंडळानी विविध विषयांवर डेकोरेशन करत जनजागृती केली. मात्र काळाचौकी येथील महागणपती गणेशोत्सवात बच्चे कंपनींसाठी खास छोटा भीमची थीम ठेवण्यात आली. छोटाभीम कालीया आणि गोलू मोलू लहान मुलांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू बनले. मागील तीन वर्षांपासून हे मंडळ बच्चे कंपनींसाठी जंगल बुक, डिस्नी सारखे देखावे बनवत आहे. टीव्हीत बघत असलेल्या कार्टून्सला प्रत्यक्षात बघण्यासाठी बच्चे कंपनी दरवर्षी उत्सुक असतात. फेवरेट असल्यामुळे छोटा भीमला बघित्याल्यानंतर त्यांना सेल्फीचा मोह आवरत नाही. बघूया तर हा बाप्पा कशा प्रकारे वेगळा ठरला आहे.