घरव्हिडिओकाँग्रेसला एक न्याय आणि भाजपा वेगळाच न्याय

काँग्रेसला एक न्याय आणि भाजपा वेगळाच न्याय

Related Story

- Advertisement -

“राज्यात पोलिसांकडून मोगलाईला लाजवेल, असा अन्याय आणि अत्याचार सुरु असल्याची घटना जालन्यात घडली आहे. याप्रकरणी जालन्यातील भाजपा युवा मोर्चाच्या कार्यकर्त्याला मारहाण करणाऱ्या पोलिसांवर गुन्हे दाखल करून त्यांना पोलीस सेवेतून बडतर्फ करा, अशी मागणी भाजपा युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांनी जालन्याच्या पोलीस अधिक्षकांकडे केली होती. आज विक्रांत पाटील यांच्यासह भाजपा युवा मोर्च्याच्या पदाधिकाऱ्यांनी या पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन ही मागणी केली आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना वेगळा न्याय आणि भाजपा युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांना वेगळा न्याय, असं व्हायला नको, असंही त्यांनी म्हटल आहे. भाजप कार्यकर्त्याला पोलिसांनी मारहाण करून दीड महिना उलटला असून अजूनही पोलिसांनी मारहाण करणाऱ्या पोलिसांवर कोणतेही गुन्हे दाखल केलेले नाहीत. त्यामुळे या पोलिसांवर तातडीनं गुन्हे दाखल करून त्यांच्यावर बडतर्फीची कारवाई करा”, अशी मागणीही पाटील यांनी केली.

- Advertisement -