viral video : भर रस्त्यातच कपलचा रोमांस, लोक झाले हैराण अन् व्हिडीओ व्हायरल

बॉलिवूड सिनेमांमध्ये आपल्याला भर रस्त्यातच हिरो आणि हिरोइन ऐकमेकांना गळाभेट घेताना दिसतात. त्यानंतर ट्राफिक जाम होत आणि पुढे काही गोष्टी घडतात. असे अनेक प्रसंग आपण पाहिले आहेत. परंतु प्रत्यक्षात जर अशी घटना घडली तर काय होईल?, याची अपेक्षाच कोणी करू शकत नाही. मात्र, अशी घटना एक घटना पुण्यात घडली आहे. तसेच यासंदर्भातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

पुण्यातील एका चौकात एक तरूण आणि तरुणी ऐकमेकांच्या गळ्यात गळे घालून उभे असतानाचा हा व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. भर रस्त्यातच हे कपल रोमांस करत असल्यामुळे प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. तसेच येथील लोकांनी गोंधळ घालण्यास सुरूवात केली.

साऱ्या जगाचा विसर पडून हे दोघे कपल ऐकमेकांच्या प्रेमात हरवून गेले आहेत. बेधुंद झाले आहेत. गाड्यांचे हॉर्न आणि माणसांचा गोंधळही त्यांना ऐकू येत नाहीये. तसेच ट्रॅफीक पोलिसही त्यांना आरडाओरड करत आहे. परंतु त्यांना कशाचेही भान नव्हते. हे दोघे आपल्याच दुनियेत असल्याचं दिसतंय.

दरम्यान, हे दोघे भररस्त्यात रोमांस करत असल्यामुळे येथील सर्व लोकं त्यांच्यावर भडकले होते. परंतु आता हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. विविध प्रकारचे कमेंट्सही या व्हिडीओला येत आहे. दरम्यान, हा व्हिडीओ जुना असल्याचं म्हटलं जात आहे.


हेही वाचा : असल्या आलतू फालतू…; नरेश म्हस्केंच्या आरोपांवर अजित पवारांनी दिले उत्तर