कोवॅक्सिनच्या बूस्टर डोसने ओमिक्रॉन येईल आटोक्यात

कोरोनामुळे आतापर्यंत प्रचंड जीवितहानी झाली आहे. कोरोना अद्यापही आटोक्यात आला नसून कोरोनावर मात करण्यासाठी लसीकरण करणे गरजेचं आहे. दरम्यान, कोरोना लसीचे दोन्ही डोस घेऊनही अनेक कोरोनाबाधीत रुग्ण आढळत आहेत. मात्र कोरोनावर मात करण्यासाठी कोवॅक्सिनचा बूस्टर डोस प्रभावी ठरेल असा दावा भारत बायोटेकने केला आहे.