- Advertisement -
पुण्यात आयपीएलच्या धर्तीवर महाराष्ट्र प्रीमिअर लीग (एमपीएल) क्रिकेट स्पर्धांचे 15 ते 29 जून दरम्यान महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने आयोजन केले आहे. महाराष्ट्राच्या सहा विभागातील सहा संघ या लीगमध्ये खेळणार आहे. मराठवाड्याचा छत्रपती संभाजी किंग्स हा संघ मराठवाड्याचे प्रथमच प्रतिनिधित्व करणार आहे. छत्रपती संभाजी किंग्स या संघाची फ्रंचाईजी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार धनंजय मुंडे यांच्या सहकाऱ्यांच्या व्यंकटेश्वरा इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने घेतली आहे.
- Advertisement -