- Advertisement -
राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारचा पहिला टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तार झाला आहे. पहिल्या टप्प्यात शपथ देण्यात आलेल्या मंत्र्यांना खातेवाटप करण्यात आले आहे. शिंदे गटातील आमदार दादा भुसे यांना बंदरे आणि खनिकर्म मंत्रीपद देण्यात आले आहे. यावरुन त्यांच्यामध्ये नाराजी असल्याची चर्चा सुरु आहे. यावर दादा भुसे यांनी प्रतिक्रिया दिले. तसेच मी मुख्यमंत्र्यांकडे कोणत्याही खात्याची जबाबदारी द्या अशी विनंती केली असल्याचेही दादा भुसे यांनी सांगितले आहे
- Advertisement -