Sunday, August 14, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ ठाकरे- शिंदे भेट व्हावी, अशी शिवसैनिकांची इच्छा - दीपाली सय्यद

ठाकरे- शिंदे भेट व्हावी, अशी शिवसैनिकांची इच्छा – दीपाली सय्यद

Related Story

- Advertisement -

शिवसेना नेत्या दीपाली सय्यद यांनी ट्वीट करुन येत्या दोन दिवसांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट होणार असल्याचे सांगितले. परंतु पत्रकार परिषदेमध्ये ट्विटबाबत स्पष्टीकरण देताना शिवसैनिकांची अशी इच्छा असल्याचे सांगत यू-टर्न घेतला आहे. शिवसेना आणि शिंदे गट असे दोन गट झाले आहेत. ते पुन्हा एकत्र यावेत, अशी सर्वांची इच्छा असून यासाठी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पुढाकार घ्यावा, असे दीपाली सय्यद यांनी म्हटलं आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांच्या भावना ओळखून निर्णय घेतला असावा, असेही दीपाली सय्यद यांनी म्हटलं आहे

- Advertisement -