घरव्हिडिओआणि चोराने केला डान्स

आणि चोराने केला डान्स

चोरी करतेवेळी चोराचा डांन्स झाला सीसीटीव्हीत कैद, दिल्ली येथील घटना

Related Story

- Advertisement -

दिल्ली येथे एक आगळा-वेगळा चोर सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाला आहे. लोकांना डान्स करताना आपण नेहेमीच बघत असतो मात्र चोरी करते वेळी नाचणारा चोर प्रथमच सीसीटीव्हीत कैद झाला आहे. हा चोर मायकल जॅक्सनचा फॅन असवा असे बोलले जात आहे. दिल्ली येथील एका अरुंद रस्त्यावरील दुकानात चोरी करताना हा प्रकार घडला. दुकान फोडतेवेळी हा चोर अचानक नाचायला लागला. या चोराबरोबर त्याचे साथीदार ही होते. एएनआयव्दारे याची सीसीटीव्ही फुटेज साईटवर टाकण्यात आली आहे. चोरांचे चेहरे झाकले असल्यामुळे त्यांची ओळख पटली नाही. मात्र पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेऊन शोध सुरु केली आहे.

- Advertisement -