घर व्हिडिओ येवल्याच्या पैठणीवर देवेंद्र फडणवीसांची प्रतिमा

येवल्याच्या पैठणीवर देवेंद्र फडणवीसांची प्रतिमा

Related Story

- Advertisement -

जगप्रसिद्ध असलेल्या येवला पैठणीवर यापूर्वी अनेक प्रतिमा साकारल्या असल्याचे फोटो आणि व्हिडीओ आपण पाहिले आहेत. परंतु कारागिराने आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिमा साकारली आहे. हाताच्या साहाय्याने विणकाम करून कारागीर मयूर मेघराज याने पैठणी शेल्यावर भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिमा साकारली आहे. महाराष्ट्राचा नकाशा काढून त्यावर देवेंद्र फडणवीस यांची प्रतिमा साकारली आहे. तसेच अकेला देवेंद्र भगवाधारी सब पे भारी असे वाक्य विणकाम करून लिहिण्यात आले आहे.

- Advertisement -