लहानपणी आपल्यावर जे बालसंस्कार होतात त्या संस्कारातून एक चांगली व्यक्ती घडते असं म्हटलं जातं. आता या बालसंस्कारा बरोबरच मुला- मुलींवर घराघरांतून डिजीटल संस्कार करण्याची वेळ आली आहे. इतका मोठा धोका सध्या ‘सायबर क्राईम’ मुळे संपूर्ण समाजाला निर्माण झाला आहे. असं वक्तव्य पोलीस उपायुक्त डॉ. रश्मी करंदीकर यांनी केलं.