मला माझ्या ज्ञानाचा वापर करून सामाजिक बांधिलकी जपायचीय

प्रत्येक क्षेत्रांत आव्हानं तर असतातच, पण त्या आव्हानांचा भार न घेता आपलं काम करत राहणं हे महत्वाचं असतं. आपण जे काम करतो, त्यातून जर का आपल्याला आनंद मिळत असेल, तर केलेल्या कामाचं सुद्धा समाधान मिळतं. मेडिकल हे फिल्ड आव्हानात्मक असतं. बालरोगतज्ज्ञ डॉ. वर्षा भोसले यासुद्धा त्यांच्या क्षेत्रात काम करताना दररोज अनेक आव्हानांचा सामना करतात. डॉ. वर्षा भोसले लहान मुलांच्या एच. आय.व्ही. व एड्सतज्ज्ञ आहेत. कुपोषण, भूकबळी, लहान मुलांचा आहार त्याचबरोबर ० ते १८ वयोगटातील मुलांचा NICUसुद्धा त्या चालवतात. त्याचसोबत अनेक आदिवासी भागात जाऊन त्या मेडिकल कॅम्प सुद्धा घेतात. त्यांच्या या कामासाठी २००८ साली डॉ. वर्षा भोसले यांना महापौर पुरस्कार मिळाला आहे.