‘दुर्गा गुडिलू’ समाजाला नवी दिशा देणारी रणरागिणी

आपल्या समाजात आजही काही जाती जमातींमध्ये अनिष्ट रु्ढी परंपरा राबवल्या जात आहेत. वैदू या भटक्या समाजातही अशाच काही जाचक रु्ढी राबवल्या जात होत्या. मात्र या समाजातील दु्र्गा गुडीलू या तरुणीने त्याविरोधात बंड पुकारले. यामुळे जात पंचायतीने तिच्या कुटुंबावरच बहिष्कार घातला. पण दुर्गाने आपल्या बंडखोरीने जात पंचायतच बरखास्त केली. तिच्या याच संघर्षमय प्रवासाबद्दल तिने ‘माय महानगर मानिनी’शी मोकळा संवाद साधला.