Monday, September 20, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ कॅन्सरला आमंत्रण देऊ नका

कॅन्सरला आमंत्रण देऊ नका

Related Story

- Advertisement -

एकीकडे संपूर्ण जग कोरोनाचा सामना करत असताना दुसरीकडे मात्र गेल्या दोन वर्षात कॅन्सर रुग्णाच्या संख्येतही वाढ होत आहे. त्यातही मध्यवयस्क रुग्णांबरोबरच तरुण रुग्णांचेही प्रमाण वाढत आहे. यातील काही केसेसमध्ये आनुवंशिक कॅन्सर जरी आढळत असला तरी आजची लाईफस्टाईलही कॅन्सरसाठी कारणीभूत ठरत आहे. याचपार्श्वभूमीवर पुण्यातील रुबी कॅन्सर रुग्णालयाचे ऑनकॉलोजिस्ट डॉक्टर मिनिष जैन विविध माध्यमातून कॅन्सर जनजागृती करत आहेत. त्याचबरोबर जंक फूडच्या मागे न लागता साधा सकस भारतीय आहार खाण्याचा सल्ला ते देतात. आताची पिढी ही जंक फूड फॅन आहे. पण हे फूड खाताना जीभेला क्षणिक आनंद मिळत असला तरी त्यामुळे शरीरावर होणाऱ्या दूरगामी दुष्परिणामाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. यामुळे पाश्चिमात्य संस्कृतीचे अनुकरण करताना आपली खाद्य संस्कृती सोडू नका असे आवाहन त्यांनी या माय नगरच्या मुलाखतीत नागरिकांना केले आहे.

- Advertisement -