- Advertisement -
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे आणि रश्मी ठाकरे यांचे भाऊ श्रीधर पाटणकर यांच्यावर ईडीने कारवाई केल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. पाटणकर यांच्या श्री साईबाबा गृहनिर्मिती प्रा लि कंपनीवर ईडीने कारवाई केली आहे. याअंतर्गत त्यांच्या ठाण्यातील निलांबरी प्रोजेक्टमधील ११ सदनिका ईडीने जप्त केल्या आहेत. याकारवाईचे धागेदोरे २०१६ साली झालेल्या नोटबंदीशी जुळल्याचे समोर आले आहे.
- Advertisement -