घरव्हिडिओबीएचआरमुळे हजारोंचे संसार झाले उद्धवस्त

बीएचआरमुळे हजारोंचे संसार झाले उद्धवस्त

Related Story

- Advertisement -

“कुणाचं नाव आहे यामध्ये हे काही मला माहिती नाही. परंतु, जे कोणी यामध्ये संबंधित असतील त्याची चौकशी होईल. यामध्ये लहान असो की मोठा असो हा काही राजकीय विषय नाही, याची चौकशी झाली पाहिजे. बी.एच.आर घोटाळ्याबाबत मल्टीस्टेट सोसायटीमध्ये कोट्यावधीचा घोटाळा झाला. या घोटाळ्याची चौकशी बीओडब्ल्यू कडून करण्यात यावी याची मागणी Adv.किर्ती पाटील यांनी २०१८ ला केली होती. मात्र, मधल्या कालखंडामध्ये चौकशीला वेग आलेला नाही. आता अनेक गोष्टी समोर यायला लागल्या आहेत. शेकडो ठेवीदारांच्या ठेवी काही लोकांनी नाममात्र दरामध्ये घेतल्या. काही ठिकाणी तर बनावट कागदपत्रांचा वापर केला गेला आहे. हा राजकीय विषय नसून ठेवीदारांच्या सुरक्षित संरक्षणाचा विषय आहे. हजारो ठेवीदारांचा पैसा याठिकाणी उद्वस्त झाला असून अनेक संसार यामुळे उद्ध्वस्त झालेले आहेत”, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी दिली आहे.

- Advertisement -