Tuesday, May 11, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ जनतेने भाजपला ठेवले सत्तेपासून दूर

जनतेने भाजपला ठेवले सत्तेपासून दूर

Related Story

- Advertisement -

“पश्चिम बंगालची निवडणूक ही भारतीय जनता पार्टीने अत्यंत प्रतिष्ठेची केली होती. पश्चिम बंगालच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी अमित शहा आणि भारतीय जनता पार्टीचे देशभरातील प्रमुख पदाधिकारी त्याठिकाणी प्रचारासाठी येत होते. या ना त्या प्रकारे पश्चिम बंगालमध्ये आपली सत्ता स्थापन करावी यासाठी भारतीय जनता पार्टी मैदानात उतरली होती. परंतु, पश्चिम बंगालच्या जनतेने पुन्हा एकदा तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी यांच्यावर विश्वास दाखवत भाजपला सत्तेपासून दूर ठेवले आहे”, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी दिली आहे.

- Advertisement -