- Advertisement -
गुरूपौर्णिमेच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना विनम्र अभिवादन केले. त्यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. गुरूपौर्णिमेला दरवर्षी बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर सर्वच नतमस्तक होत असतात. गुरूपौर्णिमेच्या दिवशी प्रत्येक शिवसैनिकाच्या मनात एक वेगळी भावना असते. आज गुरूपौर्णिमेच्यानिमित्त स्मृतिस्थळावर बाळासाहेबांना वंदन करताना एक मनामध्ये त्यांच्याबद्दल श्रद्धा आहे. त्यांच्या आशीर्वादामुळे माझ्यासारखा एक सामान्य कार्यकर्ता आणि शिवसैनिक या राज्याचा मुख्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी मला मिळाली. असं वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलंय
- Advertisement -