तीनचाकी सरकारमध्ये होणारी घुसमट लक्षात घेता एकनाथ शिंदेंनी बंडखोरी करत शिवसेनेतून काढता पाय घेतला आणि राज्यामध्ये सत्तांतर घडले. सेनेतील तब्बल 40 आमदार फोडत शिंदे सुरत, गुवाहाटी, गोवा असा प्रवास करत थेट महाराष्ट्रात येऊन मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर विराजमान झाले. शांत, मितभाषी, तळागाळातला नेता अशी ओळख असणारे एकनाथ शिंदे असं काहीसं करतील यावर अनेकांचा विश्वास बसेना, मात्र रिक्षावाल्याची रिक्षा सुस्साट सुटली. शिंदेंच्या बंडाची, त्यांच्या गुवाहाटी दौऱ्याची चर्चा तर होतेच. मात्र यासह एकनाथ शिंदे ज्या ज्या वेळीस भाषणासाठी, सभेसाठी जातात, त्यावेळी त्यांनी केलेल्या वक्तव्यासंदर्भातही अनेक बातम्या रंगतात. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आज वाढदिवस या निमित्त त्यांचे गाजलेले किस्से, व्हायरल झालेले डायलॉग पाहुयात.
शांत, संयमी असणारे शिंदे सोशल मीडियावर व्हायरल
Related Story
- Advertisement -
- Advertisement -
Advertisement