घरव्हिडिओ४७ इमारतींचे पाण्यासह वीज कनेक्शन खंडित

४७ इमारतींचे पाण्यासह वीज कनेक्शन खंडित

Related Story

- Advertisement -

उल्हासनगरमध्ये गेल्या महिनाभरात लागोपाठ दोन इमारत कोसळल्याच्या दुर्घटना घडल्या. या दुर्घटनानंतर उल्हासनगर महापालिकेने तत्काळ समिती गठीत करत १९९४ ते १९९८ या काळातील अतिधोकादायक १२२, ३६६ धोकादायक अशा ५०५ इमारतीची यादी जाहीर केली आहे. यामधील १२२ इमारती रिकाम्या करण्यासाठी पालिकेने कारवाई सुरू केली असून ४७ इमारतीचे पाणी आणि वीज कनेक्शन खंडित करण्यात आले आहे. त्यामुळे नागरीक त्रस्त झाले असून “महापालिकेने आम्हाला वेळ दिला पाहिजे होता. अचानक कारवाई केली आहे. आमची पर्यायी व्यवस्था केलेली नाही. आम्ही कुठे जाणार?,” असा सवाल केला. तर नागरिकांच्या समर्थनार्थ भाजप देखील मैदानात उतरली असून अनेक मागण्यांसाठी येत्या २५ तारखेला महापालिका मुख्यालयावर मोर्चा काढणार असल्याचं भाजप आमदार कुमार आयलानी यांनी सांगितले आहे.

- Advertisement -