घरव्हिडिओमुंबईतील वीज निर्मिती क्षमता वाढवण्याचे ऊर्जा मंत्र्याचे आदेश

मुंबईतील वीज निर्मिती क्षमता वाढवण्याचे ऊर्जा मंत्र्याचे आदेश

Related Story

- Advertisement -

12 ऑक्टोबरला रोजी मुंबईत वीज ठप्प झाली. याच पार्श्वभूमीवर मुंबईतील वीज निर्मिती क्षमता वाढवण्याचे आदेश ऊर्जा मंत्री डॉ.नितीन राऊत यांनी दिले आहेत.यासाठी उरण येथे विद्यमान प्रकल्पातील रिक्त जागेवर एक हजार मेगावॉट क्षमतेचा वायू विद्युत निर्मिती केंद्र उभारण्याच्या सुचना दिल्या आहेत. नितीन राऊत यांनी आज उरण वायू विद्युत निर्मिती केंद्राला भेट दिली.केंद्राची क्षमता कशी वाढविता येईल, याबद्दल यावेळेस सखोल चर्चा करण्यात आली. “मुंबईत पीक टाईमला सध्या वीजेची गरज 2500 मेगा वाट असते आणि 2030 ला ही गरज 5 हजार मेगावॉट असेल. तसेच 12 ऑक्टोबरला वीज बंद होण्याची घटना लक्षात घेता मुंबई आणि परिसरात वीज निर्मिती होणे गरजेचे आहे. मात्र सध्या सर्व कंपन्याची मिळून केवळ 1300 मेगावॉट वीज निर्मिती होते. 12 ऑक्टोबरला मुंबई बाहेरून होणारा वीज पूरवठा ठप्प झाल्याने मुंबईतील आयलँडिंग यंत्रणा कोलमडली. मुंबई अंधारात गेली. हे टाळण्यासाठी उरण येथे किमान 1 हजार मेगावॉट चा वीज प्रकल्प उभे करण्याची गरज आहे. त्यामुळे महाजनको कंपनीला असा पक्रल्प अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत”, असे डॉ राऊत यांनी सांगितले.

- Advertisement -