घरव्हिडिओचिपळूणमध्ये पूरस्थिती, शहर पाण्याखाली

चिपळूणमध्ये पूरस्थिती, शहर पाण्याखाली

Related Story

- Advertisement -

चिपळूण शहरात ढगफूटीमुळे पूरस्थिती निर्माण झालीय. संपूर्ण चिपळून शहर पूराच्या पाण्याखाली आहे. चिपळूण एसटी स्टॅंड, इमारती, बाजारपेठा पुराच्या पाण्याखाली गेले आहेत. चिपळूणमधील परिस्थिती दिवसेंदिवस हाताबाहेर जाताना दिसत आहे त्यामुळे २००५च्या पुराची पुनरावृत्ती होण्याची परिस्थिती निर्माण झालीय. तात्काळ आपात्कालीन विभागाकडून सर्व मदत पोहचवण्याचे आदेश प्रशानसनाकडून देण्यात आलेत. पूराने वेढलेल्या गावातील आणि शहरांतील नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी हेलिकॉप्टरची मदत घेण्याचे आदेश देण्यात आलेत. त्याचप्रमाणे पूरात अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी अतिरिक्त बोटी तात्काळ पोहचवण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लोकप्रतिनिधी आणि प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले आहेत.

- Advertisement -