घरव्हिडिओदारु खरेदी करणाऱ्याला ९४ हजाराचा गंडा

दारु खरेदी करणाऱ्याला ९४ हजाराचा गंडा

Related Story

- Advertisement -

मुंबईत लॉकडाउनच्या काळात वाईन शॉपवर दारू विक्री पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. मात्र, ग्राहकांना ऑनलाइन घरपोच दारू विक्रीसाठी राज्य सरकारने परवानगी दिली आहे. मात्र, या ऑनलाईन दारू विक्रीचा फायदा घेऊन मोठ्या संख्यामध्ये लोकांना गंडा घातला जात आहे. अंधेरी पूर्वेत एका नागरिकाने ऑनलाइन दारू घेण्यासाठी गुगल वरून वाईन शॉपचा नंबर मिळवला. मात्र, त्या नंबर वरून बोलणं करून क्यू आर कोडवर त्यांनी स्कॅन केला असता त्याच्या अकाऊंटमधून ९४ हजार रुपये काढण्यात आले. मात्र, पैसे कट होऊन देखील घरी दारूची डिलिव्हरी झाली नाही. त्यामुळे तक्रारदार यांनी अंधेरी पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली असून यासंदर्भात अंधेरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून सध्या आरोपीचा शोध सुरु आहे.

- Advertisement -