- Advertisement -
“तत्कालीन महाविकास आघाडी सरकारमध्ये भाजपा नेते देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांना अटक करण्याचा कट रचण्यात आला होता, त्याचा मी साक्षीदार आहे,” अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. या खळबळजनक खुलाश्यानंतर गिरीश महाजन यांनी ‘माय महानगर’शी संवाद साधताना सविस्तरपणे आपली भूमिका मांडत कशा प्रकारे हा कट रचण्यात आला याचा खुलासा केला.
- Advertisement -