घरव्हिडिओसरकारने शेतकऱ्यांची थट्टा लावली आहे

सरकारने शेतकऱ्यांची थट्टा लावली आहे

Related Story

- Advertisement -

जामनेर येथे आज मका आणि ज्वारी खरेदी केंद्राचे उद्घाटन माजी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते करण्यात आले. या उद्घाटन प्रसंगी माध्यमांशी बोलताना गिरीश महाजन म्हणाले की “राजेश खन्ना बद्दल काय बोलावे ते मला आज कळत नाही. मार्केटमध्ये ज्वारीला साडे बाराशे ते तेराशे रुपये प्रति क्विंटल भाव आहे. शासनाचा भाव २ हजार ६०० रुपये आहे, अशा पद्धतीने भाव असतानाही आणि शेतकरी अडचणीत असतानाही अशा पद्धतीने ज्वारी खरेदी केंद्रे सुरू केली आहेत. तरी देखील शासनाने खरेदीसाठी लिमिटेड केलेला आहे. १६५० क्विंटल एवढेच ज्वारी खरेदी करायचे आहे. यापेक्षा जास्त ज्वारी खरेदी करू नये’, असे शासनाचे आदेश आहेत हे एक प्रकारे शेतकऱ्यांची थट्टा सरकारने लावलेली आहे म्हणजे वीस-पंचवीस शेतकऱ्यांचा माल खरेदी करायचा बाकीच्या शेतकऱ्यांचा माल खरेदी करायचा नाही. एवढा माल खरेदी करूनच दाखवून द्यायचा आहे की आम्ही मालखरेदी करत आहोत हमीभाव मध्ये काहीही खरेदी करायचं नाही हेच धोरण शासनाचा आहे’, अशी प्रतिक्रिया गिरीश महाजन यांनी दिली आहे

- Advertisement -