Friday, July 1, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ गोपीचंद पडळकर यांनी वंचित बहुजन आघाढीची साथ सोडली

गोपीचंद पडळकर यांनी वंचित बहुजन आघाढीची साथ सोडली

Related Story

- Advertisement -

धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर यांनी वंचित बहुजन आघाडीला सोडचिठ्ठी दिली आहे. पडळकर हे येत्या 2 दिवसात कार्यकर्ता मेळाव्यात आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत. मुख्यमंत्री धनगर समाजाच्या आरक्षणबाबत सकारात्मक भूमिका घेत असल्याने समाजाकडूनच भाजपासोबत जाण्याबाबत दबाव येत आहे मात्र आजू याबाबत निर्णय घेण्यात आलेला नाही असे त्यांनी स्पष्ट केले. पडळकर पुन्हा भाजपात स्वगृही परतण्याचा मार्गावर असल्याच्या वृत्ताचा त्यांनी नकार दिला असला तरी ते भाजपातच परतणार असल्याचे समजते. आपले प्रकाश आंबेडकर यांच्याशी कसलेही वाद झालेले नाहीत असेही त्यानी सांगितले आहे.

- Advertisement -