- Advertisement -
भाजप नेते आणि विधानपरिषद सदस्य गोपीचंद पडळकर यांनी महाराष्ट्र पोलिसांचा सुरक्षारक्षक (बॉडीगार्ड) नाकारला आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि पवार कुटुंबिय तसेच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह सांगलीचे एस पी हे माझ्या हत्या करण्याच्या कटात सामील असल्याचा घणाघाती आरोप गोपीचंद पडळकर यांनी केला आहे. पडळकरांनी नोव्हेंबर महिन्यातील हल्ल्याचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमधून पवार कुटुंबीयच आपल्या हत्येच्या कटात सामील असल्याचे पडळकर म्हणाले आहेत.
- Advertisement -