Sunday, March 26, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ नागालॅंडमध्ये राष्ट्रवादीचा सरकारला पाठिंबा, शिंदे गटाची टीका

नागालॅंडमध्ये राष्ट्रवादीचा सरकारला पाठिंबा, शिंदे गटाची टीका

Related Story

- Advertisement -

एकूण ७ आमदार निवडून आल्याने राष्ट्रवादी काँग्रेस हा नागालँडमध्ये तिसर्‍या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या हाती विरोधी पक्षाची सूत्रे जाणार असे म्हटले जात असताना राष्ट्रवादीने अनपेक्षितरित्या सत्ताधार्‍यांना पाठिंबा दिल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. याचेच पडसाद आज, गुरुवारी विधानसभेत उमटले. नागालँडमध्येही पन्नास खोके एकदम ओके झालंय का, असा खोचक सवाल पाणीपुरवठा आणि स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील यांनी राष्ट्रवादी पक्षाच्या आमदारांना विचारला. यावरून सभागृहात गोंधळ झाला.

- Advertisement -